22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeराष्ट्रीयआशियामध्ये सर्वाधिक सायबर अ‍ॅटॅक होणा-या देशांमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

आशियामध्ये सर्वाधिक सायबर अ‍ॅटॅक होणा-या देशांमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

नवी दिल्ली : तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याच वेगाने सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. जगभरातील सायबर गुन्हेगार हे भारताला आपले लक्ष्य करत आहेत. आशिया-पॅसिफिक प्रांतामध्ये सर्वाधिक सायबर अ‍ॅटॅक झालेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक असल्याचे एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.

सायबर सिक्युरिटी फर्म असणा-या चेक पॉईंटने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. आशिया-पॅसिफिक भागात तैवान या देशावर २०२३ साली सर्वाधिक सायबर हल्ले झाले. त्यानंतर दुस-या क्रमांकावर भारत देश होता. २०२२ च्या तुलनेत भारतावर २०२३ मध्ये १५ टक्के अधिक सायबर हल्ले झाल्याचे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

२०२३ या वर्षात भारतातील प्रत्येक संस्थेवर दर आठवड्याला सरासरी २,१३८ सायबर हल्ले झाले. २०२२ च्या तुलनेत ही संख्या १५ टक्क्यांनी अधिक होती. तैवानमध्ये ही संख्या आठवड्याला ३,०५० हल्ले एवढी होती.

भारतातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित संस्थांवर सर्वाधिक हल्ले करण्यात आले. अर्थात, २०२२ च्या तुलनेत यामध्ये १२ टक्क्यांनी घट दिसून आली आहे. त्यानंतर रिटेल आणि होलसेल सेक्टरवरील हल्ल्यांमध्ये २२ टक्के वाढ झाली. त्यामुळे हे सेक्टर दुस-या क्रमांकावर राहिले. हेल्थकेअर सेक्टरवरील हल्ल्यात देखील तीन टक्क्यांची वाढ दिसून आली.

जगभरातील हल्ल्यांमध्ये वाढ
जगभरातील प्रत्येक संस्थेवर आठवड्याला सरासरी १,१५८ सायबर हल्ले झाले. २०२२ च्या तुलनेत यामध्ये एक टक्का वाढ दिसून आली. जागतिक स्तरावर आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक हल्ल्यांची नोंद झाली. तर, दुस-या क्रमांकावर आफ्रिका होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR