धरमशाला : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाळा येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने मालिकेत आधीच ३-१ ने आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात २१८ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात भारताचा पहिला डावाचा दूस-या दिवसाचा खेळ संपला असून, भारताच्या ८ बाद ४७३ धावा, तर २५५ धावांची आघाडी मिळाली.
दुस-या दिवसी खेळताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा १०३ आणि शुभमन गिल ११० धावा करून बाद झाले. रोहित शर्माने कसोटी कारकीदीर्तील १२ वे तर शुभमन गिलनेही आपले दुसरे शतक पूर्ण केले. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील चौथे शतक झळकावले. तर देवदत्त , सर्फराज आणि यशस्वी यांनी अर्धशतकीय खेळी केली. तर दुस-या दिवसअखेर भारताची धावसंख्या ८ बाद ४७३ झाली असून, भारताला २५५ धावांची आघाडी मिळाली आहे. तर कुलदीप २७ आणि बुमहराह १९ धावांवर खेळत आहेत.