24.3 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeक्रीडाभारत-दक्षिण आफ्रिकेत शनिवारी अंतिम लढत

भारत-दक्षिण आफ्रिकेत शनिवारी अंतिम लढत

बार्बाडोस : भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेतील ११ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याच्या निर्धाराने उद्या मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मागील वर्षभरात आयसीसी स्पर्धेची तिसरी फायनल खेळणार आहे. रोहित आणि टीमसमोर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत अपराजित मालिका कायम राखली आणि निर्विवाद वर्चस्व गाजवून फायनल गाठली. तरीही संघात अजूनही काही त्रुटी आहेत आणि त्या सोडवणे गरजेचे आहे.

कुलदीप यादवला सुपर ८ मध्ये मिळालेल्या संधीचे सोने करताना त्याने प्लेइंग इलेव्हनमधील आपले स्थान पक्के केले आहे. शिवम दुबे व विराट कोहली यांचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंताजनक आहे. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा हे प्लेइंग इलेव्हनमध्ये आता बदल करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. मात्र, तरीही शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये उद्या स्थान टिकवता येईल का, याची उत्सुकता आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत विराटला तिस-या क्रमांकावरून ओपंिनगला खेळवण्याचा निर्णय फार यशस्वी ठरल्याचे दिसत नाही. पण, फायनलमध्ये त्याला बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला जाणार नाही. आयपीएल २०२४ मध्ये विराटने १५ सामन्यांत सर्वाधिक ७४१ धावा केल्या, परंतु वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला १०.७५च्या सरासरीने फक्त ७५ धावाच करता आल्या आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला तिस-या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय झाल्यास, ओपंिनगला कोण हा प्रश्न उद्भवतो. अशा परिस्थितीत रिषभ पंत व रोहित हा ओपनिंग पर्याय ठरू शकतो. विराट तिस-या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो.

शिवम दुबेला या स्पर्धेत फार चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि त्याच्या जागी संजू सॅमसन हा पाचव्या क्रमांकावर योग्य फलंदाज ठरू शकतो. दुसरा पर्यात असा की रोहित व यशस्वी जैस्वाल ओपनिंगला येऊ शकतात आणि शिवमच्या जागेवार पाचव्या क्रमांकावर रिषभ पंतला खेळवले जाऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR