34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीय२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार म्हणजे मूर्खपणा

२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार म्हणजे मूर्खपणा

माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचे मत भारतीयांची सर्वांत मोठी चूक प्रचारावर विश्वास ठेवणे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीनंतर नवीन सरकारला सर्वांत मोठे आव्हान पेलावे लागेल. ते म्हणजे कर्मचा-यांचे शिक्षण आणि कौशल्ये सुधारणे, असे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले.

रघुराम राजन म्हणाले, कौशल्ये, शिक्षणात सुधारणा केल्या नाहीत तर भारताला तरुणांचा वापर करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. भारतीयांची सर्वांत मोठी चूक प्रचारावर विश्वास करणे आहे. भारताने आपल्या मजबूत आर्थिक प्रगतीबाबत प्रचारावर विश्वास ठेवून मोठी चूक केली आहे. कारण देशासमोर महत्त्वपूर्ण संरचनात्मक समस्या आहेत. आपली क्षमता पूर्ण करण्यासाठी ठिक करणे आवश्यक आहे, असे रघुराम राजन म्हणाले. भारताची सर्वात मोठी चूक प्रचारावर विश्वास ठेवणे होय. आपल्याला अजून अनेक वर्ष मेहनत करावी लागेल की प्रचार वास्तविक आणि खरा असेल. प्रचार ही अशी गोष्ट आहे. जी राजकीय नेत्यांना वाटते की तुम्ही विश्वास करावा. मात्र त्यांचा प्रचाराला बळी पडले तर ही एक गंभीर चूक असेल, असे रघुराम राजन म्हणाले. रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०४७ पर्यंत विकसीत अर्थव्यवस्था बनवन्याचा मुद्दा फेटाळला आहे. जर आपल्या देशात मुलांना शालेय शिक्षण नसेल आणि शाळा सोडण्याचा दर अधिक असेल तर यावर बोलणे म्हणजे मूर्खपणा आहे.

भारतीयांना रोजगारक्षम बनविण्याची गरज
भारतात कर्मचा-यांची संख्या वाढत आहे पण त्यांना चांगल्या नोक-या मिळत नाहीत. ही मोठी शोकांतीका आहे. भारताला प्रथम कार्यबल अधिक रोजगारक्षम बनवण्याची गरज आहे आणि दुसरे म्हणजे, त्यांच्याकडे असलेल्या कामगारांसाठी रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे.

भारतातील साक्षरता दरही कमी
राजन म्हणाले की भारतीय शाळकरी मुलांची शिकण्याची क्षमता महामारीनंतर २०१२ पूर्वीच्या पातळीवर घसरली आहे आणि इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांपैकी फक्त २०.५% विद्यार्थी दुस-या वर्गाचा मजकूर वाचू शकतात. भारतातील साक्षरता दर देखील व्हिएतनामसारख्या इतर आशियाई समकक्षांपेक्षा कमी आहे. अशा प्रकारचे आकडे आहेत ज्यांची आम्हाला खरोखर चिंता वाटते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR