वॉशिंग्टन : अमेरिकेत एका ३४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. तो शास्त्रीय नर्तक होता. जानेवारी २०२४ पासून ५-६ विद्यार्थ्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. आता अमरनाथ घोष याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत अमरनाथ वॉशिंग्टन विद्यापीठाचा विद्यार्थी होता. तो शास्त्रीय नर्तक होता. सेंट लुईस, मिसुरी येथे त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. तो कुचीपुडी आणि भरतनाट्यम करत होता. सेंट लुईस अकादमी आणि सेंट्रल वेस्ट एंड परिसरात त्याच्यावर अनेक वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तो गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधून अमेरिकेला गेला होता.
दरम्यान, अमरनाथचे काका शामल घोष यांनी सांगितले की, या घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्या पुतण्याचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रसारमाध्यमांनी अमरनाथची मैत्रिण हिमा कुप्पा हिच्या हवाल्याने सांगितले की, ‘‘तो बॅले डान्स शिकत होता. मला वाटते की, त्याला वॉशिंग्टन विद्यापीठाची पूर्ण शिष्यवृत्ती होती. नृत्यात पीएचडी करण्याचे आणि आमच्या कुचीपुडी आर्ट अकादमीमध्ये पूर्णवेळ काम करण्याचे त्याचे स्वप्न होते.