23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयमलेरियावरील भारतीय लस डब्ल्यूएचओच्या यादीत

मलेरियावरील भारतीय लस डब्ल्यूएचओच्या यादीत

नवी दिल्ली : भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मलेरिया रोगावरील भारतीय लसीला जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) यादीत सामील करण्यात आले आहे. मलेरिया आजाराने भारताप्रमाणे अनेक देशांमध्ये कहर माजवला आहे. आता मलेरिया आजारावरील एका भारतील लसीला जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणाच्या यादीत सामील केले आहे. महत्त्वाचे म्हणजे सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या आर२१/मॅट्रीक्स-एम या मलेरिया वॅक्सिनने जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध ७५ चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. यानंतर डब्ल्यूएचओने या लसीचा यादीत समावेश केला आहे.

मलेरियावरील या भारतीय लसीचे नाव आर२१/मॅट्रीक्स-एम असे आहे. ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी मिळून तयार केली आहे. याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला मंजुरी दिली होती. आता जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला लसीकरण यादीत सामील केले आहे. भारताने ३० वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर मलेरियावरील ही लस विकसित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सांगितले होते की, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने दोन तज्ज्ञ गटांच्या सल्ल्यानुसार आर२१/मॅट्रीक्स-एम या लसीला मान्यता देण्यात आली आहे. मलेरिया संशोधक म्हणून मी त्या दिवसाचे स्वप्न पाहिले होते, जेव्हा आपल्याकडे मलेरियाविरूद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस असेल. आता आपल्याकडे मलेरियाविरुद्ध लढण्यासाठी दोन लसी आहेत.

मलेरियावर स्वस्त आणि प्रभावी उपाय
आर२१/मॅट्रीक्स-एम ही डब्ल्यूएचओच्या मलेरिया प्रीक्वालिफाइड यादीत सामील होणारी दुसरी आणि पहिली भारतीय लस आहे. याआधी गेल्या वर्षी एका लसीचा या यादीत समावेश करण्यात आला होता. पण, त्यानंतर भारताने आर२१/मॅट्रीक्स-एमची निर्मिती करत जगाला मलेरियावरील स्वस्त आणि प्रभावी उपाय उपलब्ध करुन दिला आहे.

डब्ल्यूएचओच्या यादीतील दुसरी लस
जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर २०२३ मलेरिया रोगावरील आर२१/मॅट्रीक्स-एम या दुस-या लसीला मंजुरी दिली होती. ही नवी लस मलेरिया रोगाशी लढण्यास मदत करेल असे डब्ल्यूएचओने म्हटले. मलेरियाची आर२१/मॅट्रीक्स-एम ही नवी लस स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR