23.7 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeक्रीडाभारतीय महिला क्रिकेट संघाचा मोठा विक्रम, पहिला डाव ६०३ धावांवर घोषित

भारतीय महिला क्रिकेट संघाचा मोठा विक्रम, पहिला डाव ६०३ धावांवर घोषित

चेन्नई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या उभारली. एकमेव कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी चेन्नईमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्याचा पहिला डाव भारतीय संघाने ६ बाद ६०३ धावांवर घोषित केला. यासह भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढला आहे.

दरम्यान, आतापर्यंत महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नऊ विकेट्सवर ५७५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने यंदा पर्थमध्ये ही कामगिरी केली होती. तर स्मृती मानधना आणि शेफाली यांनीही या सामन्यात मोठा विक्रम केला आहे.

६०३ धावांचा डोंगर उभारण्यात सर्वांत मोठा वाटा सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधनाचा आहे. शेफालीने दमदार खेळी करत २०५ धावा तर स्मृतीने १४९ धावा केल्या होत्या. दोघींमध्ये २९२ धावांची ऐतिहासिक भागीदारी झाली. महिला क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठीही ही सर्वांत मोठी भागीदारी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR