22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनग्रॅमी अवॉर्ड’मध्ये भारतीयांचा डंका!

ग्रॅमी अवॉर्ड’मध्ये भारतीयांचा डंका!

झाकीर हुसेन, राकेस चौरसियासह शंकर महादेवन पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : भारतासाठी संगीत क्षेत्रातून आनंदाची बामती मिळाली आहे. भारताने ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार २०२४ मध्येही मोठा विजय मिळविला आहे. रविवारी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ग्रॅमी अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्काराला संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हणून संबोधले जाते. संगीत क्षेत्रातील झाकीर हुसेन, राकेश चौरसिया आणि शंकर महादेवन यांना गॅ्रमी पुरस्कार मिळाला आहे . यामुळे जागतिक स्तरावर भारताचा गौरव झाला आहे.

शंकर महादेवन, सेल्वागणेश विनायकराम, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन आणि यांनी मिळून ‘दिस मोमेंट’ हा अल्बम बनवला होता. या अल्बममध्ये आठ रचनांचा समावेश आहे. शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या ‘शक्ती’ या बँडने हा अल्बम बनवला होता. दिस मोमेंटला सर्वोत्कृष्ट ‘ग्लोबल म्युझिक अल्बम’चा पुरस्कार मिळाला. तर तबला वादक झाकीर हुसेन आणि राकेश चौरसिया यांना ‘पश्तो अल्बम’ साठीही ग्रॅमी पुसस्कार मिळाला आहे. झाकीर हुसेन यांनी ३ तर चौरसिया यांना २ ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.

या संगीतकारांनाही मिळाला ग्रॅमी पुरस्कार
दरम्यान, गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लाना डेल रे यांनाही अनेक ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. जगातील सर्वात मोठ्या संगीत कार्यक्रमात बिली इलिश, दुआ लिपा, बिली चाइल्ड, कोको जोनास, ऑलिव्हिया रॉड्रिगो आणि अनेक लोकप्रिय स्टार्सना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR