27.1 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeक्रीडाभारताचे अफगाणिस्तानसमोर १८२ धावांचे मोठे लक्ष्य

भारताचे अफगाणिस्तानसमोर १८२ धावांचे मोठे लक्ष्य

बार्बाडोस : रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत ही आघाडीची फळी अपयशी ठरली. पण, सूर्यकुमार यादवव हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अफगाणचा कर्णधार राशिद खान याने ३ महत्त्वाच्या विकेट्स घेऊन भारताला बॅकफूटवर फेकले होते, परंतु सूर्या-हार्दिक जोडीने कमाल करून दाखवली. सूर्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर हार्दिकनेही चांगली फटकेबाजी केली.

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची कोंडी झालेली पाहायला मिळाली. रोहित शर्मा ( ८) पुन्हा एकदा डावखु-या जलदगती गोलंदाजासमोर अपयशी ठरल्यानंतर राशिदने ३ विकेट्स घेतल्या. रिषभ पंत ( २०) , विराट कोहली ( २४) व शिवम दुबे ( १०) माघारी परतले. विराट पुन्हा मोठी खेळी करण्यास चुकला असला तरी त्याने एक मोठा विक्रम नावावर नोंदवला. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ४०६६ धावांचा विक्रम नावावर करताना रोहितला ( ४०४९) मागे टाकले. सूर्यकुमार यादव व शिबम दुबे या खेळाडूंवर जबाबदारी होती आणि त्यांना १४ चेंडूंत २८ धावा जोडता आल्या.

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. १५व्या षटकापर्यंत संयमी खेळ करणा-या या जोडीने गिअर बदलला. या दोघांनी ३७ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. सूर्या २८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर झेलबाद झाला. नवीन उल हकच्या गोलंदाजीवर १८व्या षटकात हार्दिक ( ३२ धावा, २४ चेंडूं, ३ चौकार व २ षटकार) झेलबाद झाला. रवींद्र जडेजा ७ धावांवर बाद झाला आणि फारुकीने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने शेवटच्या षटकांत ( १२) चांगली फटकेबाजी करून संघाला ८ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR