21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeआरोग्यस्वदेशी CAR-T सेल थेरपीमुळे भारतातील पहिला रूग्ण कर्करोगमुक्त

स्वदेशी CAR-T सेल थेरपीमुळे भारतातील पहिला रूग्ण कर्करोगमुक्त

४ कोटींवरून उपचारांचा खर्च आला ४० लाखांवर, थेरपी भारतातील १० शहरांमधील ३० रूग्णालयांमध्ये उपलब्ध

मुंबई : आयआयटी बॉंम्बे आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांनी कॅन्सरवरील ‘इम्युनोअ‍ॅक्ट’ ही विशेष प्रकारची उपचार थेरपी विकसित केली. या थेरपी नुसार भारतातील १५ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या १५ रूग्णांपैकी ३ जण कर्करोगातून मुक्त झाले आहेत.

या संदर्भात कॅन्सरमुक्त झालेले पहिले रूग्ण डॉ.व्ही.के. गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतातील ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ ने CAR-T सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली. या थेरपीनुसार कॅन्सरग्रस्त रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती जेनेटिकली री-प्रोग्रॅम केली जाते.

डॉ. गुप्ता यांची टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आता डॉ. गुप्ता कॅन्सरमुक्त झाले आहेत. CAR-T ही थेरपी घेतल्यानंतर कर्करोगाने मुक्त झालेले ते पहिले रूग्ण ठरले आहेत.

याबद्दल टाटा मेमोरिअल सेंटर आणि अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंटच्या हेमॅटो ऑनकोलॉजिस्टच्या मते ही थेरपी आयुष्यभर काम करेल की नाही, हे आताच सांगणे कठीण आहे. परंतु, सध्या गुप्ता यांच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी मुक्त झाल्या आहेत.

CAR-T सेल थेरपी…
कायमेरिक अँटीजन रिसेप्टर-टी ( CAR-T) या सेल थेरपीच्या माध्यमातून रक्तातील कर्करोगावर उपचार केला जातो. रक्तातील कर्करोगा व्यतिरिक्त या थेरपीच्या माध्यमातून लिम्फोसायटिक ल्यूकेमिया आणि बी-सेल लिंफोमा सारख्या गंभीर कर्करोगांवर उपचार केले जातात.

अँटिजन रिसेप्टर-टी सेल थेरपी हे उपचार पद्धतींमध्ये वापरले जाणारे एक प्रगत तंत्रज्ञान आहे. या थेरपीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने रूग्णाच्या शरीरातील पांढ-या रक्त पेशींच्या टी-सेल्स काढून टाकल्या जातात. त्यानंतर, टी सेल्स आणि पांढ-या रक्त पेशी वेगवेगळ्या प्रकारे शरीरात टोचल्या जातात. ही थेरपी पूर्ण झाल्यानंतर टी-पेशी कर्करोगाशी लढण्याचे काम करतात.

थेरपी आयआयटी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये
सध्या ही CAR-T थेरपी भारतातील १० शहरांमधील ३० रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. १५ वर्षांवरील रूग्ण या थेरपीद्वारे उपचार घेऊ शकतात. ही CAR-T थेरपी NexCAR 19, ImmunoACT यांनी विकसित केली आहे.

ही थेरपी आयआयटी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. हे ल्युकेमिया आणि लिम्फोमा सारख्या बी-सेल कॅन्सरच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करते. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याच्या व्यावसायिक वापरास मंजूरी मिळाली होती.

४२ लाख रूपये खर्च…
या थेरपीमुळे कॅन्सरमुक्त झालेले रूग्ण डॉ.व्ही.के.गुप्ता हे २८ वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत आहेत. तब्बल ४२ लाख रूपये खर्चून त्यांनी ही थेरपी घेतली. या थेरपीची परदेशात किंमत जवळपास ४ कोटी आहे. गुप्तांसह इतर अनेक रूग्णांसाठी ही थेरपी जीवनदायी ठरली आहे.

थेरपी भारतातील १० शहरांमधील ३० रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. १५ वर्षांवरील रूग्ण या थेरपीद्वारे उपचार घेऊ शकतात. ही CAR-T थेरपी NexCAR 19, ImmunoACT यांनी विकसित केली आहे.

ही थेरपी आयआयटी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. हे ल्युकेमिया आणि लिम्फोमा सारख्या बी-सेल कॅन्सरच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करते. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याच्या व्यावसायिक वापरास मंजूरी मिळाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR