22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरभारतातील युवा लोकसंख्या हे भारताचे बलस्थान : डेव्हिड कॉंग की

भारतातील युवा लोकसंख्या हे भारताचे बलस्थान : डेव्हिड कॉंग की

सोलापूर : भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर तर्फे नुकतेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ यावर्षी एम.बी.ए, एम.सी.ए., बी.बी.ए. व बी.सीए. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण कोरियातील अन्सर डॉट को लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट डेव्हिड कॉंग की व अपोलो हॉस्पिटल सोलापूरचा संचालिका डॉ. मीनल चिडगुपपकर हे लाभले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या स्वागतपर भाषणामध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व कार्यक्रम करण्यामागचा हेतू विशद केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय एम.बी.ए.विभाग प्रमुख प्रा. सी.आर. सूर्यवंशी यांनी करून दिला.

प्रमुख पाहुणे डेव्हिड कॉंग की यांनी आपल्या भाषणामध्ये भारतातील युवा लोकसंख्या हे भारताचे बलस्थान असून भारताची भक्कम अर्थव्यवस्था व दक्षिण कोरियातील तंत्रज्ञान यामुळे दोन्ही देशांमधील व्यवसाय वृद्धिंगत झाला असल्याचे सांगितले. दक्षिण कोरिया मध्ये अनेक भारतीय राहत असून त्यांनी भारतीय संस्कृती संस्था स्थापन केलेली आहे ज्याद्वारे विविध सण वार उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. सन 2030 पर्यंत निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत हा पहिल्या पाच मध्ये असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मीनल चिडगुपकर यांनी आपल्या भाषणामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात नीती मूल्यांचा समावेश करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीचा विचार न करता उद्योजकतेकडे ही वळावे असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार द्वारे उद्योजकता विकासासाठी विविध योजना उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले ज्यामध्ये युवा उद्योजकांना अल्पदरात कर्ज तसेच उद्योजकता वाढीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते असे सांगितले. सोलापूर हे शैक्षणिक हब होत असून विविध युनिव्हर्सिटी व महाविद्यालयांच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापुरातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये न जाता सोलापुरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा तसेच या विद्यार्थ्यांना सोलापुरातच रोजगार उपलब्ध झाला तर सोलापूरचे ब्रेन ड्रेन थांबेल,सोलापूरची आर्थिक स्थिती सुधारेल व सोलापूरला गत वैभव मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

भारती विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम. सी. ए. विभाग प्रमुख डॉ. एम. के. पाटील यांनी केले यावेळेस एम.बी.ए., एम.सी.ए.,बी.बी.ए. व बी. सी. ए. या अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाचे विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR