20.2 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रउमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना

उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना

जालना : उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात मोठा विजय आहे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केले आहे. मनोज जरांगे हे पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सगेसोय-यांचा निर्णय घेईल त्या व्यक्तीच्या बाजूने रहा, असे देखील आवाहन जरांगे यांनी केले.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. आमचा मार्ग हा राजकीय नाही.

आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही, किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायचे आहे, त्याला नक्कीच पाडेल. पुढे ते म्हणाले, मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु, मी बाजूला झालो नाही. सध्या महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. अमिष दाखवून माणसे फोडली जात आहेत. हे सर्व सरकारला जड जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा काबीज करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचा संपर्क नाही. आमची मनं एक आहेत. दोन मनं होऊ शकत नाहीत. कोणाला निवडून आणायचं हे समाज ठरवेल. पण एक लक्षात ठेवा, आई-बहिणीच्या अंगावरील व्रण समाजाने विसरू नयेत. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांनी मराठा समाजाला काही दिलेलं नाही. जो सगेसोय-यांचा निर्णय घेईल त्याच्या बाजूने रहा, असेही जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR