27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविकसीत भारताची पायाभरणी करणारा संकल्प : अजित पवार

विकसीत भारताची पायाभरणी करणारा संकल्प : अजित पवार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मने जिंकणारा आहे. या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुस-या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरला आहे. या अर्थसंकल्पाने २०४७ पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी केली आहे.

गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी कॉर्पस फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संशोधन व विकास या क्षेत्रांत नवीन उद्योग यावेत यासाठी ५० वर्षे कालावधीचे व्याजमुक्त अर्थसा , त्यासाठी सरकार १ लाख कोटी रुपयांचा निधी तयार करणार तसंच राज्य सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचं ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा, या सगळ्या बाबी राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत.

प्रधानमंत्री किसान योजनेतून ११ कोटी ८० लाख शेतक-यांना आर्थिक मदत, ४ कोटी शेतक-यांना पीएम पीकविमा योजनेचा लाभ, आत्मनिर्भर तेलबिया अभियानांतर्गत मोहरी, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न, दुग्धोत्पादन करणा-या शेतक-यांसाठी सर्वंकष योजना, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांमुळे शेतक-यांना बळ मिळणार आहे. देशात ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम तसेच १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारी, त्यांना संधी देणारी आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR