27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमुख्य बातम्यागुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी पाण्यात

गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी पाण्यात

16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण

मुंबई : गेल्या काही काळापासून सातत्याने वधारत असलेल्या शेअर बाजारासाठी आज बुधवारचा दिवस हा काळा दिवस ठरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 1,628 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (ठ्रा३८) 460 अंकांची घसरण झाली.

गेल्या 16 महिन्यामधील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मात्र 4.5 लाख कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

बँंिकग आणि वित्तीय समभागांच्या विक्रमी घसरणीने शेअर बाजाराचे कंबरडे मोडले. आज बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे एचडीएफसी बँकेतील मोठी घसरण. सेन्सेक्सच्या 1600 अंकांच्या घसरणीत एकट्या एचडीएफसी बँकेच्या 950 अंकांची म्हणजे साडे आठ टक्क्यंची घसरण झाली. बँकेच्या तिस-या तिमाहीच्या निकालानंतर ही मोठी घसरण आहे.

आजचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींसाठी सुमारे दीड वर्षातील सर्वात वाईट दिवस ठरला. यापूर्वी देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती. बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आजच 4.7 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR