24.4 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeराष्ट्रीयदहशतवादी हल्ल्यात पाक सैन्याचा समावेश

दहशतवादी हल्ल्यात पाक सैन्याचा समावेश

श्रीनगर : जम्मू-काश्­मीरमध्ये मागील काही दिवसांत दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी अनेक शस्त्र आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रे हस्तगत केली आहेत. या यंत्रांमध्ये एक अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या चिनी बनावटीच्या ‘अल्ट्रा सेट’चा समावेश आहे. पाकिस्तानी सैन्याकडून वापरले जाणारे हे हँडसेट दहशतवाद्यांकडे आढळल्याने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील संबंध पुन्हा एकदा समोर आल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.

सुरक्षा दलांनी घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची तपासणी केली असता दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैनिकांकडून प्रशिक्षण, शस्त्रे आणि दारुगोळा यांची मदत होत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे भारतीय अधिका-यांनी सांगितले. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हँडसेट हे चीनमधील टेलिकॉम कंपन्यांनी पाकिस्तानी सैन्यासाठी तयार केले आहेत. मागील वर्षी जुलैमध्ये पूँच येथे झालेल्या चकमकीनंतर असे काही हँडसेट जवानांच्या हाती लागले होते.

चीनकडून वाढती मदत
पाकिस्तानी सैन्याची क्षमता वाढविण्यासाठी चीनकडून त्यांना विविध मार्गांनी मदत केली जात आहे. यामध्ये पोलादी झाकण असलेले बंकर, ड्रोनचा पुरवठा, उच्च तंत्रज्ञान असलेले मनोरे, भूमिगत फायबर केबलचे जाळे, अनेक पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. चीनने पाकिस्तानला अत्याधुनिक रडारही पुरविले आहे. याशिवाय विविध प्रकारच्या शस्त्रांचा आणि उपकरणांचाही पुरवठा पाकिस्तानला केला जात आहे.

‘अल्ट्रा सेट’ म्हणजे काय?
‘अल्ट्रा सेट’ हँडसेटचा वापर नेहमीच्या मोबाईल हँडसेटप्रमाणे करता येतो. मात्र त्याबरोबरच, ‘ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल’ (जीएसएम)किंवा कोड-डिव्हिजन मल्टिपल अ‍ॅक्सेस (सीडीएमए) या सहसा वापरल्या जाणा-या मोबाईल तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता त्यामध्ये विशेष रेडिओ क्षमताही त्यामध्ये असते. हे यंत्र संदेशवहनासाठी रेडिओ तरंगांचा वापर करते. प्रत्येक यंत्र हे पाकिस्तानमधील एका नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, चिनी उपग्रहांच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR