21.4 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीय१६ हजार फुटावरून पडला आयफोन; मात्र सापडला सुस्थितीत!

१६ हजार फुटावरून पडला आयफोन; मात्र सापडला सुस्थितीत!

अलास्का : आपले फोन अगदी मजबूत असतात असा दावा ऍपल कंपनी सातत्याने करत असते. मात्र, कित्येक वेळा अगदी थोड्या उंचीवरुन पडूनही आयफोनच्या स्क्रीनला तडा गेल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे यूजर्स या बाबतीत आयफोनला ट्रोल करत असतानाच, एका घटनेमुळे सर्व ट्रोलर्सची बोलती बंद झाली आहे. कारण, तब्बल १६ हजार फुटांवरून खाली पडलेला एक आयफोन अगदी सुस्थितीत आढळला आहे.

काही दिवसांपूर्वी अलास्का एअरलाईन्सच्या एका विमानाचा दरवाजा हवेतच उघडला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. यादरम्यान विमानातील एक आयफोन बाहेर उडून गेला होता. हा आयफोन जमीनीवर पडला, मात्र तरीही तो सुस्थितीत आणि चालू आढळला.

बार्न्स रोड नावाच्या एका ठिकाणी राहणा-या सीनाथन बेट्स नावाच्या एका व्यक्तीला हा फोन मिळाला. या फोनचे कव्हर, स्क्रीन प्रोटेक्टर अशा गोष्टीही सुस्थितीत होत्या. बेट्स याने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. तसेच या फोनचा फोटोही त्याने शेअर केला.

मला रस्त्याच्या कडेला हा आयफोन मिळाला. हा आयफोन एअरप्लेन मोडवर आहे, यामध्ये अर्ध चार्जिंग शिल्लक आहे. तब्बल १६ हजार फूट उंचीवरुन पडूनही हा फोन सुस्थितीत आहे. असे बेट्सने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्या पोस्टमध्ये तो पुढे लिहितो, मी याबाबत माहिती देण्यासाठी संबंधित अधिका-यांशी संपर्क केला असता, मला असे समजले की विमानातून पडून सुस्थितीत सापडलेला हा दुसरा फोन आहे. या विमानाचे दार अजूनही मिळाले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR