23.9 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeक्रीडा२३ मार्चपासून आयपीएलचा धमाका

२३ मार्चपासून आयपीएलचा धमाका

बीसीसीआयचे उपाध्यक्ष शुक्ला यांची घोषणा

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीनंतर क्रिकेटप्रेमींना आता आयपीएलच्या आगामी पर्वाची उत्सुकता लागली आहे. सगळेच क्रिकेटप्रेमी आपापल्या संघाच्या विजायासाठी आतापासूनच प्रार्थना करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या वर्षाचा आयपीएल नेमका कधीपासून चालू होणार? हे विचारले जात होते. असे असतानाच आता आयपीएल २०२५ च्या पहिल्या समान्याची तारीख समोर आली आहे. खुद्द बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीच त्याबाबतची ठोस माहिती दिली आहे.

आज बीसीसीआयच्या सचिवपदी माजी क्रिकेटर देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली. तसेच बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी प्रभजीत सिंग भाटीया यांची निवड करण्यात आली. त्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयपीएल २०२५ विषयी महत्त्वाची माहिती दिली. येत्या २३ मार्च रोजीपासून आयपीएल चालू होईल असे शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

२०२४ साली आयपीएल कधीपासून चालू झाला होता?
गेल्या वर्षीदेखील आयपीएलचा थरार चांगलाच रंगला होता. २०२४ साली आयपीएलचे सामने २२ मार्च रोजी चालू झाले होते. या साली पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला होता. तर २६ मे रोजी या पर्वाचा अंतिम सामना खेळवला गेला होता. चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला होता. २०२४ सालच्या आयपीएल ट्रॉफीवर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आपले नाव कोरले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR