23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeक्रीडाआयपीएलचे १५ दिवसांचेच नियोजन

आयपीएलचे १५ दिवसांचेच नियोजन

लोकसभा निवडणुकीमुळे अर्धा हंगाम होणार परदेशात!

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२४ ची सुरूवात ही २२ मार्चपासून सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच आयपीएल चेअरमन अरूण सिंह धुमल यांनी केली आहे. आज आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. मात्र हे वेळापत्रक फक्त १५ दिवसांचेच असण्याची शक्यता आहे.

आयपीएल चेअरमन धुमल यांनी लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. यंदाच्या १७ व्या हंगामाचा पहिला सामना हा चेन्नईत खेळला जाण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या २०२४ च्या हंगामाचे वैशिष्ट म्हणजे लीग सुरू होण्यापूर्वी एक भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार आहे. मात्र पहिला सामना हा गेल्या हंगामातील फायनलिस्ट चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने होणार की नाही हे अजून निश्चित नाही.

यावर्षी एप्रिल-मे महिन्यात भारतात लोकसभा निवडणूक होत आहे. या दरम्यान आयपीएलचे देखील सामने होणार असून दोन्हीचे शेड्युल हे क्लॅश होण्याची शक्यता आहे. निवडणूक आणि आयपीएल या दोन्हीला एकाचवेळी सुरक्षा देणे शक्य होत नाही.

त्यामुळे बीसीसीआय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची वाट पाहत आहे. त्यानंतरच आयपीएलचे पूर्ण शेड्युल देखील जाहीर करण्यात येईल.

बीसीसीआयला आयपीएलमधून मोठा महसूल मिळत असतो. जर आयपीएलचा हंगाम पदेशात झाला तर हा महसूल मिळण्याची शक्यता कमी होते. यापूर्वी २००९ ला निवडणुकांमुळे आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. याचबरोबर २०१४ मध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आयपीएलचे काही सामने युएईमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तर २०१९ मध्ये निवडणुका होत असताना देखील पूर्ण लीग भारतातच खेळवण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR