23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरसोलापूर लोकसभेसाठी बनावट दाखल्याचा उमेदवार देणे हे भाजपासाठी लांच्छनास्पद

सोलापूर लोकसभेसाठी बनावट दाखल्याचा उमेदवार देणे हे भाजपासाठी लांच्छनास्पद

सोलापूर : भाजपसारख्या बलाढ्य पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात बनावट दाखल्याचा उमेदवार देणे लांछनास्पद आहे. भाजपने लोकशाहीची हेटाळणी करण्याचे काम करू नये, असे मत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

काँग्रेस भवनात नवे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांचा पदग्रहण समारंभ झाला. यानंतर त्यांनी संवाद साधला. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भाजपला सोलापूर लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार मिळत नाही. मागच्या निवडणुकीत भाजपने जो उमेदवार दिला त्याच्याकडे जातीचा बनावट दाखला होता. त्यात त्यांची फसगत झाली. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाने बनावट दाखल्याचा उमेदवार द्यावा हे लांछनास्पद आहे. बनावट दाखल्याचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे. भाजपचे लोकच आता स्थानिक उमेदवार द्यावा. अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी करीत आहेत. भाजपने लोकशाहीची हेटाळणी करू नये.

आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपमध्ये जाणार नाही हे यापूर्वीही स्पष्ट केले. आता त्यांचा प्रचार सुरू आहे, तरीही भाजप प्रवेशाची चर्चा का थांबत नाही. या मागे कोण आहे असे विचारले असताना शिंदे म्हणाले, या मागे कोण आहे हे आम्हाला माहिती नाही; पण भाजपला त्यांचे लखलाभ होवो. काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळावी, अशी आमची इच्छा आहे. आम्ही आणि प्रदेशाध्यक्षांनी आमचे मत हायकमांडला कळविले आहे. आता हायकमांड जो निर्णय देईल आम्ही त्यासोबत राहू, असेही शिंदे म्हणाले. यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, अशपाक बळोरगी आदी उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महाविकास आघाडीतील नेत्यांची बोलणी सुरू आहे. आघाडीकडून त्यांना बैठकीला बोलावले जाते. यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असेही शिंदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR