16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeसोलापूरजिल्ह्यातील १२८ वाड्यांवर जलजीवन मिशन राबविणार : कोहिणकर

जिल्ह्यातील १२८ वाड्यांवर जलजीवन मिशन राबविणार : कोहिणकर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या १२८ कामांचे सुधारित अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली.

दरम्यान, जलजीवन मिशनच्या मंजूर झालेल्या कामात काही गावातील वाड्यावस्त्यांचा समावेश झाला नव्हता. सुधारित अंदाजपत्रकात त्या वाड्यावस्त्यांचा समावेश करून शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने १२८ कामांचे सुधारित अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात आले आहे. शासनाकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर ती १२८ सुधारित कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे कोहिणकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची सुमारे ५२ ते ५५ कोटीची बिले थकीत आहेत. या संदर्भात शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर जल जीवन मि शन अंतर्गत कामाची थकीत असणारी ठेकेदारांची बिले अदा करण्यात येणार आहे.असे जि.प ग्रामीणपाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR