34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeपरभणीजानकर-मोदी एकत्र आल्याने परभणीचा विकास थांबणार नाही

जानकर-मोदी एकत्र आल्याने परभणीचा विकास थांबणार नाही

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मराठावाडा दौ-यावर होते. मोदी यांनी पहिली सभा नांदेडमध्ये तर दुसरी सभा परभणीत घेतली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते, यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत भाजपा सरकारच्या कामांची माहिती दिली.

आता परभणीचा विकास कोणीही थांबवू शकत नाहीत, कारण मोदीजींच्या नेतृत्वात महादेव जनकर यांना उमेदवारी दिली आहे. मोदीजी फकीर आहेत आणि जानकरही फकीर आहेत. आता हे दोन लोक एकत्रित आल्यानंतर या परभणीला कोणीही थांबवू शकत नाही. मोदीजींनी करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढले. अनेकांचे परिवर्तन केले. परभणीत अनेक प्रकल्पांना आम्ही पैसे दिले असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महादेव जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजानाची किल्ली आहे. आम्ही त्यांचा शब्द मोडू शकत नाही. महादेव जानकर जमिनीवरचे आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या राजकुमारांना वायनाडमध्ये संकट दिसत आहे. त्यांना जसे अमेठीतून पळून जावे लागले तसेच वायनाड सोडावे लागेल असे म्हणत निशाणा साधला आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला.

महाराष्ट्रातील नांदेड येथे जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की काल देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ज्यांनी मतदान केले, विशेषत: ज्यांनी पहिल्यांदा मतदान केले त्यांचे मी अभिनंदन करतो. मतदानानंतर बूथ स्तरापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी केलेलं विश्लेषण आणि जी माहिती मिळत आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान झाल्याचा विश्वास पक्का होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR