27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeछत्रपती संभाजीनगर९०० एकरांवर जरांगे यांचा दसरा मेळावा

९०० एकरांवर जरांगे यांचा दसरा मेळावा

नारायण गडावर जय्यत तयारी, भूमिकेकडे लक्ष

मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यातच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात प्रथमच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. नारायण गडावरील तब्बल ९०० एकरांवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास २०० एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे. नारायण गडाच्या एकूण ९०० एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. मेळाव्यासाठी येणा-या बांधवांची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यातील हिट लक्षात घेता पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील पहिल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलतील, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR