28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeक्रीडाजसप्रीत बुमराहचा विक्रम

जसप्रीत बुमराहचा विक्रम

बंगळूरू : न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यातील तिस-या दिवशी जसप्रीत बुमराहने खास विक्रमाला गवसणी घातली. तिस-या दिवसाच्या खेळात बुमराहने आपल्या विकेट्सचे खाते उघडले. टॉम ब्लंडेलच्या रुपात त्याने न्यूझीलंडच्या संघाला पाचवा धक्का दिला. ही विकेट्स खात्यात जमा होताच जसप्रीत बुमराहच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली.

यंदाच्या वर्षात कसोटीत सर्वाधिक ३९ विकेट्स आता त्याच्या खात्यात जमा झाल्या आहेत. १५ डावात त्याने हा पल्ला गाठला आहे. जसप्रीत बुमराहने यंदाच्या कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणा-या गोलंदाजांच्या यादीत आपलाच सहकारी आर अश्विन याला मागे टाकले. अश्विनच्या खात्यात ३८ विकेट्स जमा आहेत. त्याच्यासह इंग्लंडचा गस अ‍ॅटकिन्सन, शोएब बशीर आणि श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्या या मंडळींचाही समावेश आहे.

२०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स
३९* – जसप्रीत बुमराह (भारत)
३८* – आर अश्विन (भारत)
३८ – गस अ‍ॅटकिन्सन (इंग्लंड)
३८ – प्रभात जयसूर्या (श्रीलंका)
३८ – शोएब बशीर(इंग्लंड)

बुमराहची सर्वोत्तम कामगिरी
बुमराह हा टीम इंडियातील प्रमुख गोलंदाज आहे. या वर्षातील त्याने इंग्लंड विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्याचे पाहायला मिळाले होते. फेब्रुवारीमध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने ४५ धावा खर्च करताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय वर्षाच्या सुरुवातील जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौ-यातील केपटाउन कसोटीत त्याने ६१ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR