22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeराष्ट्रीयराम मंदिरात गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू

राम मंदिरात गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम मंदिराच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या (एसएसएफ) जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. शत्रुघ्न विश्वकर्मा (२५) असे या जवानाचे नाव आहे. आज पहाटे ५.२५ वाजता कोटेश्वर मंदिरासमोरील व्हीव्हीआयपी गेटवर हा जवान तैनात असताना समोरून त्याच्या कपाळाला गोळी लागली. यानंतर त्याच्यासोबत घटनास्थळी तैनात असलेल्या इतर सुरक्षा कर्मचा-यांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशेष म्हणजे या जवानाला कोणी गोळी मारली याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडण्यापूर्वी जवान विश्वकर्मा घटनास्थळी आपला मोबाईल पाहत होते, तेव्हा त्यांना गोळी लागली. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, या जवानाने स्वत:वर गोळी झाडली की दुस-यानी कोणी गोळीबार केला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जवानाच्या मृत्यूनंतर मंदिर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. ज्या ठिकाणी सैनिक तैनात करण्यात आले होते त्या ठिकाणापासून राम मंदिराचा मुख्य भाग १५० मीटर अंतरावर आहे.

यापूर्वीही दोन सुरक्षा कर्मचा-यांना लागल्या होत्या गोळ्या
दरम्यान, यापूर्वीही राम मंदिरात दोन सुरक्षा कर्मचा-यांना गोळ्या लागल्या आहेत. यावर्षी २६ मार्च रोजी रामजन्मभूमी संकुलात कमांडो राम प्रताप यांच्या छातीत गोळी झाडण्यात आली होती.एके-४७ साफ करत असताना त्यांना गोळी लागली होती. मात्र तो वाचला. याशिवाय २५ ऑगस्ट २०२३ रोजी मंदिर परिसरात एका सैनिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता हे तिसरे प्रकरण घडले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR