22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमनोरंजन‘जवान’ ठरला सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन चित्रपट

‘जवान’ ठरला सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन चित्रपट

मुंबई : फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा २७ जानेवारीपासून सुरू झाला आहे. यावेळी हा पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या काही कॅटेगिरीमधील पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर इतर कॅटेगिरीतील विजेत्यांची नावे आज (रविवार) जाहीर करण्यात येणार आहेत.

शाहरूख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाला यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामधील सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स या कॅटेगिरीतील पुरस्कार देखील या चित्रपटाला मिळाला आहे.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर या कॅटेगिरीमधील पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय, सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन या कॅटेगिरीतील फिल्मफेअर पुरस्कार देखील ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने पटकावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR