20.6 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रजयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले

जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले

पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावरून सुरू केली आहे.
शिवनेरी गडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील आणि अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले. या थरारक घटनेने उपस्थितांना भयभीत केले होते.
दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष आपल्या तयारीत गुंतले आहेत. अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेची सुरुवात झाल्यानंतर, आता शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुस-या पर्वाची सुरुवात आज शिवनेरी गडावरून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे, रक्षा खडसे आणि महेबूब शेख हे क्रेनमध्ये चढले होते.

पुष्पहार अर्पण करून खाली येत असताना क्रेनमध्ये अचानक बिघाड झाला. अर्ध्यावर पोहोचल्यावर क्रेन तुटले आणि जयंत पाटील आणि अमोल कोल्हे खाली पडण्याची शक्यता होती. सुदैवाने, कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.
शिवस्वराज्य यात्रेच्या आयोजकांनी या घटनेची दखल घेतली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सुरक्षितता आणि दक्षता घेतली जाणार आहे. यात्रेत सहभागी होणा-या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

शिवस्वराज्य यात्रेद्वारे राज्यातील विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्यांवर लोकांशी चर्चा केली जाईल. त्यांनी सांगितले की, या यात्रेद्वारे महाराष्ट्राचा हरवलेला आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी आणि महायुतीला पराभूत करण्यासाठी लोकांना एकत्र आणले जाईल. पक्षाचे खासदार आणि वरिष्ठ नेते विविध ठिकाणी या यात्रेत सहभागी होतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR