27.8 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeराष्ट्रीयवक्फ विधेयकाला जेपीसीची मंजुरी

वक्फ विधेयकाला जेपीसीची मंजुरी

वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम सदस्य असणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारचा प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकाच्या मसुद्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. या विधेयकाचा मसुदा आता संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) आज बहुमताने स्वीकारला. तर विरोधी पक्षातील खासदारांना विरोधातील मते मांडण्यासाठी दुपारी ४ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारपर्यंत विरोधकांना यावर आक्षेप घेण्याची संधी मिळणार आहे.

संयुक्त संसदीय समितीच्या आजच्या शेवटच्या बैठकीत विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी १४ जणांनी विधेयकाच्या बाजूने तर ११ जणांनी विरोधात मतदान केले. या समितीमध्ये एकूण ३१ खासदारांचा समावेश आहे. ६५५ पानांचा मसुदा वाचण्यासाठी आणि त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी अतिशय कमी वेळ दिला, असा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी घेतला. काल (मंगळवारी) सायंकाळी त्यांच्याकडे मसुदा देण्यात आला आणि आज सकाळी १० वाजता यावरील आक्षेप मागितले गेले असल्याचा आरोपही विरोधी बाकावरील खासदारांनी केला.

दोन्ही सभागृहांचे एकूण ३१ खासदार या संयुक्त संसदीय समितीमध्ये असून यापैकी १६ एनडीए (१२ भाजपा) तर १३ खासदार विरोधी पक्षातील आहेत. एक खासदार वायएसआरसीपी पक्षाचा तर एक खासदार नामनिर्देशित आहे. काल पार पडलेल्या बैठकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाने सुचविलेल्या १४ सूचना समितीने स्वीकारल्या. तर विरोधकांनी सुचविलेल्या ४४ सूचना फेटाळल्या गेल्या. विरोधकांनी मांडलेल्या सूचना या वक्फ कायदा, २०१३ च्या विरोधात होत्या, अशी माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR