काबूल : वृत्तसंस्था
टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या सुपर ८ च्या लढतीत अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. या कामगिरीनंतर देशातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्यने रस्त्यावर उतरले.
अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारतानंतर उपान्त्य फेरीच्या लढतीत प्रवेश केला आहे. राशिद खानच्या टीमने बांगलादेशला पराभूत करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला.
अफगाणिस्तानने आयसीसीच्या स्पर्धेत उपान्त्य फेरीत पहिल्यांदा प्रवेश केला आहे. या आनंदात अफगाणिस्तानात काबूल ते कंदहार राशिद खानच्या टीमचे चाहते मोठ्या संख्येने रस्त्यावर जमलेले पाहायला मिळाले.
रस्त्यांवर क्रिकेट चाहत्यांची गर्दी मोठ्या संख्येने जमल्यानंतर स्थानिक प्रशासनाला रस्ते मोकळे करण्यासाठी कसरत करावी लागली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.