22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन आरोपीच्या आईचे उडवाउडवीचे उत्तर

अल्पवयीन आरोपीच्या आईचे उडवाउडवीचे उत्तर

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना क्राइम ब्रांचने ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. विशाल अग्रवालला याआधीच अटक करण्यात आली आहे. विशाल अग्रवालला तुरुंगातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. उद्या म्हणजेच २ जूनला आई-वडिलांना सोबतच न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अटक केल्यानंतर शिवानी अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत आईकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रक्त नमुने बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये शिवानी अग्रवाल यांचा सहभाग तपासण्यात येणार आहे. सबळ पुरावे हाती लागल्यावरच कारवाई सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी देखील अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि वडील विशाल अग्रवाल हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

विशाल अग्रवालवर विविध गुन्हे
पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तू कार चालवत होता असे पोलिसांना खोटे सांग असे विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम ४२० च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्दल हा गुन्हा आहे. तर, ड्रायव्हरचे अपहरण व धमकी दिल्याचाही गुन्हा अग्रवाल पिता-पुत्रावर आहे.

अजित पवारांनी घेतली ंिटंगरेंची बाजू
स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे शंकेने बघितले जात आहे असे पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, चौकशी करु द्या ना, मी पण बारामतीचा ३२ वर्षांपासून आमदार आहे. आम्ही कामामुळे मुंबईत असतो, कधी पुण्यात असतो. मी मतदार संघात नसतो. जे आमदार असतात, ते बहुतेक त्यांच्या मतदारसंघात असतात. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास त्यांना संबंधित ठिकाणी जावे लागते. एकदा सुनील टिंगरेंच्या मतदासंघात स्लॅब कोसळला होता. त्यावेळीही ते मदतीला धाऊन गेले होते. तसेच या घटनेत निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यामुळे सुनील टिंगरे त्या ठिकाणी गेला आणि दोषींवर कारवाई करण्यास सांगितले होते अशी जूनी आठवण सांगत अजित पवारांनी सुनील टिंगरेंची बाजू मांडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR