36.5 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeराष्ट्रीयनामिबियाहून आलेल्या ‘ज्वाला’ने दिला ३ बछड्यांना जन्म

नामिबियाहून आलेल्या ‘ज्वाला’ने दिला ३ बछड्यांना जन्म

भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्त्यांचे कुटुंब वाढू लागले आहे. ज्वाला या चित्ता मादीने तीन पिलांना जन्म दिला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त होत होती.
१६ जानेवारीला याच पार्कमध्ये ‘शौर्य’ चित्त्याचे निधन झाले होते. मात्र आता ज्वाला या चित्ता मादीने तीन पिलांना जन्म दिला असून आता कुनोमध्ये अजून ३ चिमुकले चित्ते आल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. या तिन्ही पिलांच्या जन्माने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचेही यादव यांनी नमूद केले. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (पूर्वीचे ट्वीटर) वरून त्यांनी ही ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे. ‘कुनोचे नवीन शावक’असे त्यांनी लिहिले आहे. नामिबियातील चित्ता ज्वालाने तीन शावकांना जन्म दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये याआधी आणखी एका चित्ता, आशा हिनेही गुड न्यूज दिली होती. आशा या मादीने यावर्षी ३ जानेवारी रोजी आनंदाची बातमी दिली होती, तिने एकाच वेळी तीन पिलांना जन्म दिला. यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये आघाडीवर काम करणा-या वन्यजीव वॉरियर्सचे अभिनंदन केले. देशभरातील वन्यजीवप्रेमींसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतातील वन्यजीवांच्या समृद्धीसाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कुनोमध्ये नव्या पाहुण्यांचे स्वागत
तर त्याआधी सिया नावाच्या चित्ता मादीने गेल्या वर्षी मार्चमध्ये ४ बछड्यांना जन्म दिला होता. मात्र, सियाच्या बछड्यांपैकी अवघा एकच चित्ता आता जिवंत आहे. उर्वरित तिघांचा अकाली मृत्यू झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही या कामगिरीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेमुळेच देशात चित्ते परतले असून आज मध्य प्रदेश चित्त्यांचे राज्य बनण्यात यशस्वी ठरले आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नामिबियन चित्ता ‘आशा’ने तीन बछड्यांना जन्म दिला. त्यानंतर आता ज्वालाने देखील तीन बछड्यांना जन्म दिल्यामुळे या प्रकल्पाकडे पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR