32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeमहाराष्ट्रकंबोज यांच्या अडचणी वाढल्या

कंबोज यांच्या अडचणी वाढल्या

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियातील १०३ कोटी रुपयांच्या घोटाळ््या प्रकरणी सीबीआयने खटला बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

सीबीआयने त्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने फेटाळला असून संबंधित प्रकरण पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केले आहे. प्रकरण नव्याने ऐकण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. प्रकरण पुन्हा नव्याने ऐकले जाणार असल्याने कंबोज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज व इतर काही जणांनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची १०३ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा आरोप आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR