नवी दिल्ली : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ संघाचे नेतृत्व करताना करुण नायर याने आपल्या बॅटिंगमधील कर्तृत्वही दाखवून दिले. देशांतर्गत वनडे स्पर्धेतील दुस-या सेमी फायनलमध्ये महाराष्ट्र विरुद्धचा सामना जिंकत त्याने विदर्भाला फायनलमध्ये एन्ट्री मिळवून दिली. संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणा-या करुण नायर याने सेमी फायनल लढतीत २०० च्या स्ट्राइक रेटने धावा कुटत मोठा विक्रम आपल्या नावे केला. विशेष म्हणजे फिल्डवर असलेल्या ऋतुराज गायकवाडचा विक्रम मोडित काढण्याचा पराक्रम त्याने केला आहे.
विजय हजारे स्पर्धेत संघाचे नेतृत्व करताना एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करुण नायरने आपल्या नावे केला आहे. त्याने ऋतुराज गायकवाडला मागे टाकत या विक्रमाला गवसणी घातली. यंदाच्या विजय हजारे स्पर्धेत करुण नायरने विदर्भ संघाचे नेतृत्व करताना ७५२ धावा ठोकल्या आहेत. यात ५ शतकासह एका अर्धशतकाचा सामावेश आहे.
एवढेच नाहीतर ७ सामन्यात तो फक्त एकदाच आउट झाला. भारतीय क्रिकेटमधील प्रमुख लिस्ट ए स्पर्धेत संघाचे नेतृत्व करताना एका हंगामात ७०० पेक्षा अधिक धावा करणारा करुण नायर हा पहिला कॅप्टनही ठरला आहे. ऋतुराज गायकवाड याने २०२२-२३ च्या हंगामात ६६० धावा केल्या होत्या. गायकवाडनं पाच डावात २०२० च्या सरासरीसह या धावा केल्या होत्याय. ज्यात ४ शतकांचा सावेश होता.