28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रकास पठार गर्दीने फुल्ल !

कास पठार गर्दीने फुल्ल !

सातारा : प्रतिनिधी
कास पठार परिसरात पावसाळी पर्यटन आता बहरू लागले असून कास तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. शनिवार, रविवार व बकरी ईद अशा सलग सुट्या जोडून आल्याने कासचे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

उत्तरेश्वर घाटापासून कास पठार, कास तलावापर्यंत पर्यटकांच्या वाहनांची गर्दी दिसून आली. कास, बामणोली परिसरात अधूनमधून रिमझिम पडणारा पाऊस यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ओढे व झरे वाहू लागले आहेत. कास पुष्प पठार, कास तलाव या परिसरात देखील अधूनमधून पडणारा पाऊस व दाट धुके यामुळे या परिसरातील वातावरण अल्हाददायक बनले आहे. सुटीचा आनंद निसर्ग अनुभवून पर्यटकांनी घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR