परभणी : शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल वैभवनगर येथे संस्थेचे संस्थापक कै. म. श. शिवणकर यांच्या जयंतीनिमित्ताने विभागीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे हे ४८वे वर्षे होते. मराठवाड्यातील विविध प्रशालेचे ३२ संघ या विभागीय वक्तृत्व स्पर्धेत सहाभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार झरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. विलास पोहंडूळकर, संचालक पवनकुमार झांजरी उपस्थित होते. यावेळी उपमुख्याध्यापक आर. जी. तुम्मेवार, पर्यवेक्षक बी.के. कोपरटकर, पर्यवेक्षिका सीमा बोके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिंधू शर्मा, विद्याविहारचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कविश रामेश्वर बेद्रे (सरस्वती विद्यालय, गंगाखेड), व्दितीय पायल गजानन डोईजड (छत्रपती माध्य व उच्च माध्य विद्यालय, दांडेगाव ता. कळमनुरी), तृतीय विद्या मुंजा रोडे (सौ. रामकंवर व्दारकादासजी लड्डा स्कूल, मानवत), उत्तेजनार्थ एक वेदांत सचिन टोंगळे (महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, नांदेड), उत्तेजनार्थ दोन विनित सुनिल ओस्तवाल (भारतीय बाल विद्यामंदिर, परभणी) आदीनी पारितोषिक प्राप्त केले.
या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी प्रा. दिपाली महिंद्रकर, प्रा. अपर्णा जोशी, आत्माराम जाधव हे होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अरूण बोराडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक आर.जी. तुम्मेवार यांनी, स्वागत गीत संगीत विभाग प्रमुख रमाकांत पैंजणे व प्रफुल्ल शहाणे यांच्या संचाने सादर केले. या प्रसंगी रांगोळी पोट्रेट रेखाटणारे वसुंधरा शिसोदे वर्ग १०वी, अजय डाके, स्वराज यादव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन स्पर्धा विभाग प्रमुख गजानन जुमडे यांनी केले. सुभाष ढगे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीनी परिश्रम घेतले.