23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणातील आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय प्रकरणात दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयाने सध्या या प्रकरणात केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. आता केजरीवाल यांच्या नियमित जामिनावर २३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांनी जामीन आणि अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आता २३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीबीआयला २३ ऑगस्टपर्यंत उत्तर द्यायचे आहे. केजारवाल यांचे वकील सिंघवी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव तात्काळ अंतरिम जामीन मागितला होता, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि अंतरिम जामिनाची मागणी नाकारली. सिंघवी म्हणाले होते की, मी अंतरिम जामीन दाखल केला आहे, आरोग्याची समस्या आहे. केजरीवाल यांना अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी सिंघवी यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR