22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयकेंद्राविरोधात केरळच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन

केंद्राविरोधात केरळच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन

नवी दिल्ली : दक्षिणेतील राज्ये अनेकदा केंद्र सरकारवर अन्याय केल्याचा आरोप करत असतात. कर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर जाऊन निदर्शने केली असून केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, दोन दिवसांत दक्षिण भारतातील दोन मोठ्या राज्यांचे प्रमुख राजधानी दिल्लीत आंदोलनासाठी आले आहेत. बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या सर्व आमदार, खासदार आणि विधानपरिषद सदस्यांसह निषेध करण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. आता गुरुवारी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आपल्या आमदार आणि खासदारांसह दिल्लीत आहेत. दोन्ही राज्यांच्या आंदोलनाचे कारण एकच आहे. केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांशी आर्थिक भेदभाव करत असल्याचा आरोप दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी केला.

केंद्राविरोधात निषेध नोदवण्यासाठी बुधवारी कर्नाटक तर गुरुवारी केरळचे सत्ताधारी आमदार एकत्र आले. केरळमध्ये डाव्यांचे सरकार असून आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना केंद्राविरोधातील त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार अनुदान नाकारुन राज्याच्या आर्थिक लाभात कपात करत असल्याचा आरोप यावेळी केला. तसेच, आंदोलनाचा उद्देश केवळ केरळच नाही तर सर्व राज्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे आहे असेही ते म्हणाले.

दक्षिणेतील तीन राज्यांचा केंद्राला विरोध
कर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री विरोध करत असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांना पाठिंबा देणारे पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव कर असून, राज्य सरकारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काळात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री विजयन यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR