कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या प्रशांत कोरटकर बाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रशांत कोरटकरला न्यायालयाने झटका देत आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने या मागणीवर निर्णय देत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तो मी नव्हेच म्हणत गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. अटक केल्यानंतर मंगळवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी २८ मार्च रोजी पूर्ण होत असून आज कोरटकरला मोठया पोलिस बंदोबस्तात कोर्टासमोर सादर केलं. तर न्यायधीश एस एस तट यांच्या समोर सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार, इंद्रजीत सावंत यांच्या तर्फे अँड.असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले आहेत. तर प्रशांत कोरटकर यांच्या तर्फे सौरभ घाग हे प्रत्यक्ष वकील म्हणून उपस्थित होते.
अशातच, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अॅड. सौरभ घाग आणि अॅड. असीम सरोदे यांच्यात कोर्टासमोर तू-तू, मैं-मैं झाल्याचे बघायला मिळाले आहे. तर दोघांनी एकमेकांना शांत बसा, असा दम भरला आहे. पोलिस चौकशीत कोरटकरने काही नाव घेतली आहेत. त्यात खरंच त्यांचा सहभाग आहे का? याची चौकशी करण्याची आहे असा गंभीर गुन्हा असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, धीरज चौधरी याने मदत केल्याचं यात सांगितले जात आहे. काही हॉटेलमध्ये थांबलो होतो हे देखील कोरटकर याने सांगितले आहे. यावेळी कोणतीही ऑनलाईन पैसे दिले नाहीत, त्यामुळे याला कुणी मदत केली हे पहावे लागेल. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी ५ दिवसांची पोलिस कोठडी हवी आहे अशी बाजू सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार यांनी मंडळी आहे.