सांगली : सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता.
त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणा-या सूरज निकमच्या आत्महत्येमुळे सांगलीतील कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पैलवान सूरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील रहिवासी होता.