22.6 C
Latur
Saturday, July 20, 2024
Homeराष्ट्रीयअरुणाचल प्रदेशात भूस्खलन; चौघांचा मृत्यू

अरुणाचल प्रदेशात भूस्खलन; चौघांचा मृत्यू

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील कमले जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात एका अध्यात्मिक गुरूसह चौघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अध्यात्मिक गुरू आणि त्यांचे तीन सहकारी प्रवास करत असताना ही घटना घडली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलिस अधीक्षक थुटन जांबा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बांधकामाधीन ट्रान्स अरुणाचल महामार्गावर ही घटना घडली.

त्यांनी सांगितले की, अध्यात्मिक गुरू पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील असून त्यांचे सहकारी आसाममधील होते. हे सर्वजण सुबनसिरी जिल्ह्यातील डंपोरिजो येथे तीन दिवसीय कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर इटानगरला जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, रागा पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले. त्यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR