22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeपरभणीशिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच

शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच

पाथरी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जुने जाणते कडवट शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाल्याचे चित्र सध्या पाथरी तालुक्यात पहायला मिळत आहे. यामुळे पाथरी विधानसभेसाठी इच्छुक असणारे सईद खान यांच्या उमेदवारीला बळ प्राप्त होत आहे.

शिवसेना भवन कार्यालय येथे दि.१० जुलै रोजी शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनेक कार्यकर्त्यांना सक्रिय पदाधिकारी म्हणून निवडी करण्यात आल्या. यावेळी माजी आ. माणिकराव आंबेगावकर, माजी जि.प.सदस्य दादासाहेब टेंगसे, जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, तालुका प्रमुख विठ्ठल रासवे, शहर प्रमुख युसूफोद्दीन अन्सारी, सर्जेराव गिराम, . एस.कांबळे, शाखेर सिद्दिकी, खालेद शेख, बालाजी दहे, वैजनाथ कोल्हे इत्यादीसह शेकडो कार्यकर्त्यांची आणि पदाधिका-यांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन दिलीप हिवाळे यांनी केले.

यावेळी शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माऊली कदम, प्रमोद तारे, मनोहर लाडाने, विजय नांगरे, विलास वाघ, अशोक रनेर इत्यादींची विविध महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली. सोबतच सतीश धर्मे, अजीम बागवान, विनायक मोरे, भागवत मोरे, जगन्नाथ बादाडे, सरपंच सुनील पाते, सरपंच संतोष खराबे, उपसरपंच रामकिशन कोरडे, मुंजा लवंदे, सुरेश रसाळ, अशोक रनेर, अंगद रनेर, दासराव रेंगे, शिवाजी गरड इत्यादी लोकांचा समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR