22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रमिलेट्सयुक्त चॉकलेटमध्ये अळ्या !

मिलेट्सयुक्त चॉकलेटमध्ये अळ्या !

अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणा-या मेळघाटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेळघाटमधील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणा-या मिलेट बारमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून हा मिलेट्स बार दिला जातो. मात्र हा खळबळजनक प्रकार उघडकीस येताच या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळेत निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. परिणामी, शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलाय की काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना आहे. मात्र अनेकदा ही योजना वादाच्या भोव-यात सापडली आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR