22.2 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयजी-७ परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी

जी-७ परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी

रोम : वृत्तसंस्था
इटलीमध्ये जी-७ परिषद होत आहे. त्यापूर्वीच इथल्या संसदेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
इटलीच्या संसदेत एका दुरूस्ती विधेयकावरून खासदारांमध्ये वादावादी झाली. एकमेकांना धरपकड आणि मारहाण झाल्याची घटना घडली. देशातल्या काही भागांना स्वायत्तता देण्यासंबंधीचे हे विधेयक होते. काही खासदारांनी या विधेयकाला विरोध केला आणि मग पुढे जे घडले ते जगाने व्हिडीओच्या माध्यमातून बघितले आहे.

व्हिडीओत दिसते की, विरोधी पक्षाचे खासदार लियोनार्डो डोनो हे मंत्री रॉबर्टो कॅलडेरोली यांना इटलीचा झेंडा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु त्यांनी तो झेंडा स्वीकारण्यास नकार दिला आणि मागे सरकले. त्यातच इतर खासदारांनी गर्दी केली आणि बघता बघता वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाले. परराष्ट्र मंत्री एंटोनियो तेजानी यांनी खेद व्यक्त करत म्हटले की, माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्याकडे जगासमोर आदर्श ठेवायचा आहे.. राजकीय वाद उपस्थित करुन मारहाण करण्याचे प्रकार योग्य नाहीत. इटलीतल्या अपुनियामध्ये ५०व्या जी-७ शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख सहभागी होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR