18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeसोलापूरसोलापूरात मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीत वकिलांचाही सहभाग व जोरदार समर्थन

सोलापूरात मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीत वकिलांचाही सहभाग व जोरदार समर्थन

सोलापूर – मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात मराठा आरक्षणा करिता शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सोलापूर वकील संघातील ज्येष्ठ व मान्यवर वकीलांनी देखील सहभाग नोंदविला. ही मराठा आरक्षणा साठीची निर्णायक व संविधानिक लढाई आहे.

मराठा समाज मागास असल्याचे वेगवेगळ्या आयोगाने दिलेल्या अहवालावरून सिध्द‌ झाले आहे.शासनकर्ते याला राजकीय स्वरूप देऊन हा लढा मोडण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुद्यावरून बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निर्णय घ्यावेत अशी मागणी देखील वकिलानी केली.

या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे ॲड. सुरेश- बापू गायकवाड ज्येष्ठ वकील इंद्रजीत पाटील ॲड. दादासाहेब जाधव ॲड. विक्रम काटोळे ॲड. लक्ष्मण भोसले ॲड प्रज्योत मुटकुळे ॲड बाबूंशा साळुंखे, ॲड. समाधान दळवे, ॲड. अजीत पाटील, ॲड. प्रशांत देशमुख, ॲड. प्रविण निकम, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तामामा मुळे आदीनी उपस्थिती दर्शवून सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR