22.8 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeपरभणीआयुष्यात यशस्वी होण्यासाठी निर्णय घ्यायला शिका : प्रा. सोनटक्के

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी निर्णय घ्यायला शिका : प्रा. सोनटक्के

परभणी : सुंदर आयुष्याची सुरुवात ख-या अर्थाने आज ज्ञानसाधनेतून होत आहे. ज्ञानसाधना ही केवळ शैक्षणिक संकुल नसून एक चळवळ आहे. जगत असताना नैतिकतेची आचारसंहिता पाळून बिनधास्त जीवन जगले पाहिजे. माणूस हा स्वत:च स्वत:चा शत्रू असतो. परीक्षेमध्ये मार्क्स मिळविले म्हणजेच सर्व काही जीवन असते असे काही नाही. जो माणूस प्रत्येक क्षण जगतो तो संपूर्ण आयुष्य चांगल्या रीतीने जीवन जगू शकतो. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आनंदी राहायला व योग्य तो निर्णय घ्यायला शिका असे प्रतिपादन ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना केले.

तालुक्यातील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये दि.२८ रोजी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षातील पदवी फायनल वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के व प्रमुख पाहुणे प्रा.शीतल सोनटक्के उपस्थित होत्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डी.व्ही. सूर्यवंशी, प्राचार्य सलाउद्दीन, विभाग प्रमुख ए. ए. नजन, विभाग प्रमुख पी.एन. काळे, सांस्कृतिक प्रमुख सी.ए. कुमावत व जे.आर. पडोळे, कार्यालयीन प्रमुख एन.व्ही. पन्नाड, एम.बी.ए. प्रमुख आकाश सोनटक्के उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.कुमावत यांनी केले.

यावेळी संस्थेच्या सचिव शितल सोनटक्के यांनी शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे. शिक्षणाने आपल्याला वेगवेगळी प्राप्त झालेली मूल्ये कधीच विसरायची नसतात. स्पर्धेच्या युगात आपल्याला ज्ञान मिळवणे खूप गरजेचे असले तरी मिळवलेले ज्ञान केव्हा कोठे आणि कशा पद्धतीने आपण दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी आणतो याला खूप महत्त्व आहे. आपल्याला व्यवहारिक ज्ञान असणे खूप गरजेचे आहे असे सांगितले.

या कार्यक्रमांमध्ये नायपर २०२४ गुणवंत विद्यार्थी अल्का बालासाहेब बल्लाळ व विठ्ठल शेषराव भोसले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फायनल वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्ती केली. सूत्रसंचालन डिग्री तृतीय वर्षाच्या सिद्धार्थ बागुल व सुप्रिया चवरे या विद्यार्थ्यानी केले तर कार्यक्रमाचा समारोप प्रा.पवार एम इ. यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डिग्रीच्या सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांनी व फार्मसीच्या संपूर्ण स्टाफने विशेष मेहनत घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR