24.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरतर पालकमंत्री भूमरेंना जिवे मारू, संभाजीनगरात ‘गब्बर’ आला

तर पालकमंत्री भूमरेंना जिवे मारू, संभाजीनगरात ‘गब्बर’ आला

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गब्बर चांगलाच चर्चेत आला आहे. प्रशासनातील विशेषत: पोलिस प्रशानातील भ्रष्ट अधिका-यांवर लक्ष्य ठेऊन हा गब्बर पुढे आला असून काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता. ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिका-यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो. आता, असाच गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचे पत्र व्हायरल झालं आहे. ज्यात आपण शंभर लोकांची गँग तयार केली असून, लवकरच संभाजीनगर मधील भ्रष्टाचार अधिका-यांचा हत्याकांड करणार असल्याचा दावा केला जात आहे.

विशेष म्हणजे हे भर चौकात करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे. तसेच, या पत्रात सूचना देताना माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांना जीवेच मारू, असेही म्हटले आहे. या पत्रामुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे स्वत:ला गब्बर सांगणा-या या व्यक्तीने ‘ रिश्वत मत लेना वरना गब्बर आये जायेगा’ असा उल्लेख पत्रात केला आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा असून हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बिडकीन पोलीस स्टेशनच्या आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीणच्या वरीष्ठ आणि भ्रष्ट पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या भ्रष्ट व राजकारण्यांची गावगुंडांची रखेल असलेल्या कायदा सुव्यवस्थेला कंटाळुन जन्मलेला एक “गब्बर”, असे म्हणत या निनावे गब्बरने पोलिस महासंचालकांच्या नावे एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये, विषय लिहिताना बिडकीन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांविरुद्ध तक्रार केली आहे.

विषय – बिडकीन पोलीस स्टेशनला गावगुंड आणि पालकमंर्त्यांच्या असलेल्या उजवे-डावे हात यांचं ऐकून आणि भा*** पोलीस निरीक्षक संतोष दयानंद माने आणि गणेश शिवाजीराव सुरवसे यांसारख्या भ्रष्ट अधिकारी जे गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांची गळचेपी करतात. वरील विषयी एक धमकी पूर्व व सूचना पूर्व अर्ज देतो की, मी गब्बर राहणार छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीण भाग सांगायचे असे की मागील काही वर्षापासून बिडकीन पोलीस स्टेशन येथे कायदा सुव्यवस्था चे ंिधडावडे उडवले जात आहेत. कारण बिडकीन पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक पदावर जेव्हापासून संतोष दयानंद माने व गणेश शिवाजीराव सुरवसे यांसारखे मांडवली करणारे व हप्तेखोर अधिकारी बसल्यापासून गोरगरिबांना न्याय मिळण्याची अपेक्षा संपली आहे. कारण बिडकीन येथील येथील गावगुंड मधुकर मोहनराव सोकटकर, दिगंबर तुळशीराम कोंिथबिरे, काकासाहेब बाबासाहेब टेके, बबन नाना ठाणगे, सुभाष कैलास जाधव, सागर भास्कर फरताळे, विजय चव्हाण (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष), माणिक (मामा) राठोड जनसेवा बियर बार, जफ्फार शेख, सरपंच अशोक धर्मे, लतीफ कुरेशी, अमोल भैया नखडे , अविनाश दादा राठोड व जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे व त्यांचे सुपुत्र विलास बापू भूमरे, शिवराज भुमरे, सद्दाम भैय्या सय्यद, माजी नगरसेवक फिरोज सय्यद, फहाद चाऊस, असलम भैया पठाण, आकाश गोरख धर्मे, महेमुद शहा (भांडेवाले) कारण असे आहे की मागील काही वर्षापासून बिडकीन परिसरात वरील गावंगुंडांची दहशत पसरले आहे हे गाव गुंड पालकमंर्त्यांचे नगरसेवकांचे व सरपंचांचे डावे उजवे हात आहेत कार्यकर्ते आहेत.. असे म्हणत हे पत्र लिहिण्यात आलं आहे. त्यामध्ये, काही टीप आणि सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलीस महासंचालकांना निनावे आलेल्या ह्या पत्रामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
टीप –

1. यांना बजावून सांगण्यात यावे की रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जायेगा

2.वरील नमूद केलेल्या सर्व गावगुंडांना लवकरात लवकर समज देण्यात यावा अन्यथा होणा-या हत्याकांड खूप भयंकर असतील व त्याला महाराष्ट्र गृह विभाग व पोलीस प्रशासन जबाबदार असेल व जे सर्व लोक हे हत्याकांड घडवून आणतील त्यांना आपण निर्दोष सोडवून आणताल हे आपले काम आहे.!

3). भविष्यात मला जरी पकडून आपण जेलमध्ये टाकलेकिंवा माझ्या जीवाचं बरं वाईट कोणी गावातील गावगुंड यांनी केलं तर माझी टीम ही पूर्ण भारतभर पसरलेली आहे ते याचा बदला जरूर घेतील हे आपण लक्षात ठेवावे..!

4). भविष्यात होणा-या घटना आणि हत्याकांड पाहायचे नसतील तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी माननीय अमितेश कुमार साहेब यांच्या सारखा इमानदार संविधानिक पद्धतीने काम करणारा गोरगरिबांना न्याय देणारा व बिडकीन पोलीस स्टेशनच्या निरीक्षक पदी अभिमान पवार सारखा सिंघम ऑफिसर बसवा..!

5). भविष्यात होणारे हत्याकांड टाळायचे असतील तर बिडकीन पोलीस स्टेशनला गोरगरिबांना न्याय व प्राधान्य देणारा अधिकारी बसवा व जसे की मी सांगितलं की कुठल्याही गोरगरिबांना तक्रार करायची असेल तर वरील गाव गुंड नगरसेवक सरपंच या लोकांची पोलीस स्टेशनला

6). महिला पोलीस कर्मचा-यांवर बीडमध्ये अत्याचार झाले आहे त्या अत्याचाराशी संबंधित, सर्व आरोपी असलेल्या पोलीस अधिका-यांना आम्ही जीवेच मारणार आहोत..!

7) महोदय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य साहेब बघा आपल्या राज्यात लोकशाहीचे ंिधडवडे उडवले जातात बघा आज जे रक्षक आहेत ते समाजाचे भक्षक होतात बघा आपण ज्या महिला पोलीस यांच्या अब्रुची लख्तर वेशीवर टाकणारे आपलेच अधिकारी उच्च अधिकारी आहेत बघा साहेब बघा हे महाराष्ट्रभर प्रदर्शन होतंय अहो घ्या महाराष्ट्रभर समाजाची जी रक्षण करतात लोकशाहीमध्ये महिला पुरुष समान अधिकार दिला आहे आणि वर्दीला कलंक लावण्याचा काम असले फालतू अधिकारी लांडग्यासारखे अधिकारी करताहेत अहो मग महिला सुरक्षित कुठे आहे जर तुमच्या डिपार्टमेंट मध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये जर महिला सुरक्षित नसेल तर बाहेर समाजातील वावरणा-या महिला कशा सुरक्षित राहतील काय कायद्याचा गैरवापर वापर होत असेल आणि काय कायद्याने न्याय देण्याच्या आपण अपेक्षा कराल काही वाचक आहे की नाही..!

8). सावित्री फुले, राष्ट्रमाता जिजाऊ च्या लेकी सुरक्षित कुठेय बोला ना बोला रामाची सीता सुरक्षित कुठे बोला द्रोपतीचे चिरहरण आज पण होत आहे बोला रावणापेक्षा आजचे आपल्या वर्दीतले रावण कसे वाटतात बघा साहेब बघा रावणाने तरी सितेला लंकेत नेऊन सुरक्षित ठेवले होते मात्र आपल्याच पोलीस डिपारमेंट मध्ये सीता सुरक्षित कुठे आहे द्रोपती सुरक्षित कुठे आहेत फुले सावित्री राष्ट्रमाता जिजाऊ च्या लेकी सुरक्षित कुठे आहेत..!

9). यानंतर जर का जिल्ह्याच्या पालकमंर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही अन्याय अत्याचार घडला आणि जे आरोपी पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे समर्थक असतील आणि जर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्या आरोपींना वाचवण्याचाकिंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गाड्यांचा ताफा फढॠ लॉन्चरने आणि अङ47 ने उडवून टाकेल..!

10). मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून माझा कुठल्याही पक्षाशी कुठल्याही संघटनेची वरील व्यक्तींनी अथवा माननीय महासंचालक साहेबांनी संबंध जोडू नये ही गोष्ट लक्षात घ्यावी मी कुठल्याही पक्षाचा नाही मी एक सामान्य व्यक्ती आहे जो काही असामान्य काम करणार आहे जसे की मी तुम्हाला वरती सांगितलेच आहे.
सूचना –

1). माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदिपान भुमरे यांना आम्ही जिवेच मारु..! त्यामुळे माझी सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे..!

2). यानंतर बिडकीनच्या कुठल्याही राजकारण्यांचा गावगुंडांचा कुठल्याही केस मध्ये अथवा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप झाला नाही पाहिजे.

3). मी पत्रात नाव घेतलेल्या गावगुंडांना राजकारण्यांना कायद्याच्या चौकटीत राहावे असा आपण समज द्यावा अन्यथा आम्ही लवकरच यांचं शरद मोहोळ आणि गजू तौर करु..!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR