19.3 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रविकासासाठी मोदी यांची मदत घेऊ

विकासासाठी मोदी यांची मदत घेऊ

पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सत्ताही स्थापन करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने मोदींना समर्थन दिले. आता शरद पवार यांनीही बारामतीच्या विकासासाठी मोदींचीही मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही, असे विधान केले आहे. बारामती येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळावा पार पडला. यावेळी बोलताना बारामतीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं पवार यांनी म्हटले. आज आनंदाचा दिवस, असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

दुष्काळी दौ-यासाठी मी जेव्हा निघतो, तेव्हा पावसाची सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगले वर्ष आहे, त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादनात दोन नंबरला गेला, राज्य सरकारने शहाणपण दाखवले नाही. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन जास्त झाले, पण केंद्र सरकारने निर्बंध आणले, हे निर्बंध आणू नका, असे मी त्यांना सांगितले होते, असे पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR