29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeराष्ट्रीयभाजपची २०० उमेदवारांची यादी तयार, दोन दिवसात होणार जाहीर

भाजपची २०० उमेदवारांची यादी तयार, दोन दिवसात होणार जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अब की बार ४०० पार चा नारा त्यांनी दिला. विरोधकांवर हल्लाबोल करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, भाजपची निवडणूक तयारी पूर्ण झाली आहे. भाजपच्या सुमारे २०० उमेदवारांची यादी तयार आहे. तीन ते चार दिवसांत सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान होणे निश्चित आहे आणि त्यांना कोणीही रोखू शकणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली नुकतीच भाजप सीईसीची बैठक पार पडली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या सीईसी बैठकीत उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, उत्तराखंड, गोवा, झारखंड, दिल्ली, त्रिपुरा, हरियाणा आणि १५० हून अधिक लोकसभा जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी विचारमंथन झाले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अनेक नव्या चेह-यांना संधी दिली जाऊ शकते. याशिवाय काही आमदारांंना देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. भाजपच्या नेतृत्वात एनडीएला ४०० जागा ज्ािंकता याव्यात यासाठी भाजपने अनेक मित्रपक्षांना सोबत घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR