28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी शरद पवार गटाची ४५ उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ४५ उमेदवारांची यादी जाहीर

अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार भिडणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पुन्हा एकदा दिसणार आहे. तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे युवा नेते महेबुब शेख यांना बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

४५ उमेदवारांची यादी
इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदपूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरूर – अशोक पवार
शिराळा – मानसिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
केज – पृथ्वीराज साठे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मुर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व – दुनेश्वर पेठे
तिरोडा – रविकांत बोपचे
अहेरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – रुपकुमार चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वर्पे
शेवगाव – प्रताप ढाकणे
आष्टी – महेबुब शेख
हडपसर – प्रशांत जगताप

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR