परभणी : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ६ लाख रूपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकांनद पाटील यांना अंमली पदार्थ वाहतुक व विक्री करणार्या इसमांचा शोध घेऊन माहिती काढून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक ८ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि राजु मुत्येपोड, पोउपनि चंदन परिहार व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार परभणी रेल्वे स्थानकाबाहेर काही इसम गांजा विक्री व वाहतुकीसाठी माल घेऊन आलेले आहेत.
पोलिसांनी छापा मारला असता त्याठिकाणी शेख अकबर शेख जाफर (वय २५ रा.इंदिरा नगर परतुर जि.जालना, सुनिल सुंदर हरिजन (वय १९ वर्षे रा. पकनागुडा जि. कोराकुटा राज्य ओरीसा) यांना पकडण्यात आले.
त्यांंच्याकडुन ३२.२०० किलोग्रॅम गांजा किमंत अंदाजे ६ लाख ४ हजार रुपयाचा पंचासमक्ष जप्त करण्यात आला. त्यांनी हा गांजा साथीदार शेख कलीम शेख जहुर रा. परतुर जि. जालना याच्याकडुन घेतल्याचे सांगितले व तो रेल्वेने मानवतकडे गेल्याचे सांगितले. तेव्हा पथकाने पाठलाग करुन त्यास पकडले. आरोपीविरुध्द एनडीपीएस कायद्याप्रमाणे नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.