21.5 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमुख्य बातम्यालोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये शक्य!

लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये शक्य!

निवडणूक आयोगाचे पत्र व्हायरल; तात्पुरता मतदानाचा दिवस १६ एप्रिल २०२४ घोषित केला

नवी दिल्ली : लोकसभेची आगामी निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात आज (२३ जानेवारी) निवडणूक आयोगाचे एक पत्र व्हायरल झाले, त्यातून १६ एप्रिल ही तारीख ठरल्याचे संकेत मिळाले.

दरम्यान, याबाबत निवडणूक आयोगाने देखील स्पष्टीकरण दिले. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले की, निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केली आहे. निवडणूक आयोगाच्या या स्पष्टीकरणामुळे १६ एप्रिल रोजी निवडणूक होणार या चर्चेला आता ब्रेक लागला आहे.

निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने १६ एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिका-यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. तसेच १६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये काय?
निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस १६ एप्रिल २०२४ घोषित केला आहे. अधिसूचना दिल्लीच्या सर्व ११ जिल्हा निवडणूक अधिका-यांना जारी करण्यात आली होती. त्यावर ‘भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालन’ असे शीर्षक आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने थोड्याच वेळात ट्विटरवर याची पोस्ट टाकली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR